घरासमोर ही झाडे असतील तर होईल खूप त्रास आणि संकट, जाणून घ्या सविस्तर

नमस्कार आपल्या घरच्या कुंडीत असलेले झाडे किंवा घराच्या परिसरातील लावलेली अथवा आपोआप उगवलेली झाडे,मग ती फलझाडे असोत किंवा शोभेची झाडे, प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात, त्यांच्या गुणधर्मानुसार सकारात्मक /नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते. त्यांचा प्रभाव त्या घरातील व्यक्तीवर पडत असतो म्हणून झाडे लावताना ती नेहमी आपल्यासाठी हितकारक आहेत की अपायकारक आहेत हे पडताळून पाहणे आवश्यक आहे.


चला तर आज पाहुयात सुखकारक, positivity देणारे व मन प्रसन्न करणारे व सकारात्मक ऊर्जा देणारे वृक्ष.

१) आपल्या सर्वांच्या अंगणामद्धे तुळशी वृंदावन असावे. त्यामुळे आपल्या घरावर ईश्वरी कृपा राहते,पण तुळशी वृंदावन प्रवेशद्वारासमोर असू नये तसे असल्यास “ द्वारवेध ” हा दोष निर्माण होतो.

२ ) घराशेजारी व आपल्या प्लॉटमद्धे ‘काटेरी झाडे’ लावू नयेत, असल्यास ती काढून टाकावीत. त्यामुळे घरात गृहकलह, अशांती, शतरूभय ही त्रास उद्भवतात. परंतु गुलाब आणि कोरफड याला अपवाद आहेत. ही दोन रोपटी घरात किंवा घराबाहेर लावल्याने वाईट शक्तिपासून घराला संवरक्षण मिळते. कोरफड ही घरच्या उत्तर दिशेला असावी.

३ ) घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हे नारळाचे झाड पश्चिम तसेच दक्षिण दिशेला लावावीत. फणसाचे झाडही दक्षिण दिशेला शुभ मानले गेले आहे.

४ ) नागकेशर, पांढरा चाफा, आणि बेल ही झाडे घराभोवती असावीत. या झाडाजवळ साधन केली तर मन प्रसन्न होते. दरवर्षी यातले एक झाड लावावे. पुण्य मिळते, यश मिळते.

५ ) घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.

६) घरासभोवार कडूनिंब लावल्यास हवेतील प्रदूषण नष्ट होते. सामाजिक भान ठेवून आपल्या परिसरात, आपल्या विभागात, आपल्या गावात अधिकाधिक कडूनिंबाची झाडे लवावीत.

७ ) घरच्या आग्नेय दिशेष लाल फुले येणारी झाडे असणे त्रासदायक असते, त्याचबरोबर घराभोवती काटेरी कुंपण असू नये.

८ ) कोणत्याही झाडाची विशेषतः वड आणि पिंपळ या झाडांची सावली आपल्या घरावर पडू नये. शास्त्र असे सांगते की, सोने देणारे झाड जरी असेल तरी त्याची सावली घरावर पडणे हा दोष आहे.

Share On:

Leave a Comment