घरावर संकट, त्रास होतोय ? जाणून घ्या कारण आणि उपाय.

मानवाच्या तीन मुलभुत गरजापैकी ‘निवारा’ म्हणजेच घर ही मुख्य गरज आहे. आपल हे घर सुखदायी असाव शांत असाव घरातील सर्व सदस्य स्वस्थ असावेत हीच आपली मनोमन प्रार्थना असते. परंतु आपल्या घरातील किंवा आसपासच्या काही वस्तु अथवा घटना या घरातील सदस्यांच्या शरीरावर, मनावर परिणाम करत असतात तर आज आपण अशाच काही घटना व त्यांचे चांगले अथवा वाईट परिणाम याविषयी सविस्तरपणे जाणून येणार आहोत. चला तर आजच्या या लेखाला सुरुवात करुयात.

हेही अवश्य वाचा. – जपमाळ माहिती : जप कोणत्या बोटाने करावा,कधी व कश्याप्रकारे करावा. संपूर्ण माहिती

 वास्तुबाबत शुभ / अशुभ लक्षण
1 ) ज्या घरात कीटकांचे जाळे किंवा मधमाशीचे पोळे असते त्या घरातील जो कर्ता माणुस असतो त्यास खुप कष्ट व त्रास सोसावा लागतो.
2) जमीन उकरताना जर जिवंत साप निघाला तर घर बांधताना पुढे दुर्घटना होण्याचे हे संकेत असतात, अशावेळी 'सर्प शांती' करूनच पुढील कामास सुरुवात करावी.
3) जमीनी उकरताना जर हाडे किंवा राख मिळाल्यास त्या जागेची शांती करणे आवश्यक असते.
4) अत्याधिक खडकाळ जमिनीवर बांधलेल्या घरातील व्यक्तिंना सतत काही ना काही त्रास सहन करावा लागतो.
5) घरामध्ये उत्तर किंवा पुर्व दिशेस मोकळी जागा असल्यास हे खुप शुभ मानले जाते.

हे ही वाचा – औदुंबर पूजन : परम फलदाई व दत्तप्रिय औदुंबराची संतती सुखासाठी अशी करा सेवा.

 6) घराच्या आतील जागेत  मोठा खड्डा असणे,अवजड वसू असणे किंवा खुप घाण हे घरातील मुख्य व्यक्तिस अपायकारक असते.
7) घराचा मुख्य दरवाजा हा खुप मोठा नसावा नाहीतर त्या ठिकाणी अनेक असामान्य घटना घडतात.
8) जर घराच्या मुख्य दरवाजापासून रस्ता सुरू होत असेल तर त्या घरावर कधीही मोठं संकट येवु शकते.
9) घरात अचानक उंदीर वाढले तर भविष्यातील संकटाची ती पुर्वसुचना समजावी.
1 0) घरात जर काळ्या मुंग्या समुहाने फिरत असतील तर हे शुभ समजले जाते परंतु जर लाल मुंग्या आपल्याला समुहाने फिरताना दिसल्या तर त्या घराला लवकरच मोठ्या संकटाला अथवा नुकसानीला सामोरे जावे लागेल हे समजावे.
11) घराच्या मुख्य दरवाजासमोर एखादा मोठा वृक्ष असेल तर या घरातील लोक इतरांचा द्वेष करतात.

अशाप्रकारे आपल्या घरातील अथवा घराबाहेरील काही घटना ,व आपल्याला विविध संकेत देत असतात गरज असते ती फक्त आपण त्यांना समजून घ्यायची व त्यावरती काम करायची. तर आजची ही माहीती आपल्याला कशी वाटली नक्कीकमेंट करून सांगा आणि हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

Share On:

1 thought on “घरावर संकट, त्रास होतोय ? जाणून घ्या कारण आणि उपाय.”

Leave a Comment