वाहन व्यवसायात प्रगती व अपघात टाळण्यासाठी तोडगे/उपाय

नमस्कार,
आज वाहन हे आपल्या जीवनातील महत्वाची गोष्ट बनले आहे. आज प्रत्येक घरी किमान एक मोटारसायकल तरी असतेच आणि आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचा ट्रक,रिक्शा,टेम्पो किंवा इतर वाहने असतील आणि त्यापासून आपला उदरनिर्वाह होत असतो किंवा आपल्या एकूण उत्पन्नात त्यांचा मोलाचा वाटा असतो तर आपण त्याचे महत्व जाणू शकता. आपले वाहन सुरक्षित तर आपण सुरक्षित हे तर आपल्याला पटत असेलच आणि म्हणूनच आपले वाहन अपघातपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि आपल्या वाहनाच्या धंद्यात प्रगती होण्यासाठी काही खास उपाय/ सोपे तोडगे या लेखात आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करुयात.

1] यंत्र व मंत्र उपाय

हा ऊयाय करण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री एक जाड कागदावर शेजारील यंत्र काढावे. हे यंत्र काढल्यानंतर ते एक तासभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, त्यानंतर त्याची गंध, अक्षता व फुले वाहून पूजा करावी, त्यानंतर उदबत्ती व निरंजन ओवाळुन ते यंत्र उजव्या हातात घेऊन एकाग्र चित्ताने या यंत्राकडे पाहत-
” ॐ वाहनत्रयलाभकृत दिक् स्वाहा ” हा मंत्र 1 माळ म्हणावा , मंत्र म्हणून झाल्यावर हे यंत्र वाहनाच्या सिटखाली ठेवून द्यावे , व पुढे कधीही गाडी सुरू करताना हा मंत्र म्हणूनच सुरू करावी

2] समोरील काचेवर लावा रक्षक फोटो


हा उपाय करताना आपल्याला आपल्या वाहनाच्या पुढच्या काचेवर , श्री स्वामी समर्थाचे दोन फोटो लावायचे आहेत, ते अश्याप्रकारे लावावेत की एक आतून आपणास दिसेल असा व एक बाहेरून समोरून दिसेल असा लावावा . याचा परिणाम असा होईल की स्वामींवर आपली सतत दृष्टी पडेल व मुखात स्वामी नाम येईल व स्वामी कृपेने समोरील संकट कोसो दूर राहील परिणामी आपण सुरक्षित राहाल.

3] नारळाचा उतारा

हा उपाय आपल्याला करायचा आहे तो दर अमावस्येला, दर अमावस्येला एक नारळ वाहनावरून गाडीचे इंजिन चालू असताना उतरवून , उतारा करून फोडावे .

4] इंजिन शेजारी ठेवा या वस्तु

एका नवीन लाल वस्त्रात अथवा काळ्या पिशवित रसरसीत पिवळे लिंबू टाचणी टोचून , धूप देवून , एक नकटी , एक कवडी , एक बिबा , कडू कार्ल्याच्या 4-5 फांद्या , काळे तिळाची पूडी , श्री स्वामी समर्थ मंदिरातील , केंद्रातील यज्ञाची विभुती , छोट्या प्लॅस्टिकच्या डबीत घालून त्याच रंगाचे दोऱ्याने पिशवी शिवून इंजिनमध्ये बाजूस तारेने कायमची अडकवून ठेवावी . शक्य झाल्यास दर अमावस्येस लिंबू बदलवावे .

5] देवघरात ठेवा अशी एक डब्बी

हा उपाय करण्यासाठी देवघरात एक छोटा डब्बा ठेवावा व रोज रात्री आपल्या वाहना मार्फत आलेले जे पैसे असतील त्यापैकी आपल्या नफ्याचा काही भाग 1 ते 10 टक्के प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने त्या डब्यात टाकावा व तो डब्बा नंतर सुरक्षित ठेवावा. शिवाय आलेला पैसा किमान एक दिवस तरी घरी ठेवावा आला त्याच दिवशी खर्च करू नका. हे सर्व करण्यामागील कारण म्हणजे यात महारांजांना धंद्यात भागीदारी दिल्याचे तत्व आहे, त्यामुळे अपघाताचे भय नसते आणि धंदाही तेजीत चालतो.

तर आशा आहे आपण हे उपाय नक्की करून पहाल, आणि फरक पहा ,आज या भागात इथेच थांबूयात भेटूया लवकरच.. श्री स्वामी समर्थ.

हे ही पहा-

  • घोरकष्टोउद्धरण स्तोत्र (सर्व कष्ट व संकटनाशासाठी )
  • अधिक माहितीसाठी खालील विडियो नक्की पहा.


    Share On:

    Leave a Comment