देवता प्रसन्न करायची आहे? जाणून घ्या कोणात्या देवाला कोणते फुल अर्पण करतात.

मित्रांनो, मनुष्य असो अथवा ईश्वर त्याला आपण त्याच्या आवडीच्या वस्तु अर्पण केल्या, दिल्या तर तो निश्चितच प्रसन्न होत असतो,आणि मग आपणास हव्या असलेल्या गोष्टी अगदी सहज भेटतात. अगदी त्याचप्रमाणे जर आपणास आपल्या इष्ट देवाला कोणते फुल, कोणते वस्त्र व नैवेधी कधी अर्पण करावे हे समजले तर आपल्या वर त्या देवतेची कृपा झालीच म्हणून समजा.

देवाला योग्य फूल वाहावे.

आपल्या जीवनात फुलांचे खूप महत्व आहे. फूल ही ईश्वराची अशी निर्मिती आहे, जिच्या सुगंधामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. त्यांचा सुगंध मनाला शांती देतो. खरे तर देव हा भावाचा, भक्तीचा भुकेला असतो, परंतु आपल्या देशात देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याच्यावर त्याच्या आवडीची फुले वाहण्याची श्रद्धा देखिल आहे. असे म्हटले जाते की देवाच्या आवडीच्या रंगला आधार मानून त्याला त्याच रंगाची फुले वाहिली जातात. लक्षात ठेवा, देवाची पूजा कधीही सुकलेल्या फुलांनी करू नका. कमळाच्या फुलाबद्दल अशी अशी श्रद्धा आहे की हे फूल दहा ते पंधरा दिवस देखील शिळे होत नाही. चाफ्याच्या कळी व्यतिरिक्त कोणत्याही फुलाची कळी कधीही देवाला अर्पण करू नये. कोणत्याही देवतेच्या पूजेत केवड्याची फुले वाहिली जात नाहीत.आता कोणत्या देवाला कोणती फुले प्रिय आहेत आणि कोणत्या देवाच्या पूजेत कोणती फुले विशेष करून वापरावीत याची थोडक्यात माहिती घेऊयात.

१) भगवान विष्णु

ही फुले वाहावे : केवडा , चाफा , मोगरा , गुलाब , जाई , कुंद , पांढरे किंवा तांबडे कमळ , तुळस , तुळस मंजिरी .
वस्त्र : पिवळे , नैवेद्य : दूध – भात .

२) भगवान शिव शंकर

अर्पण करावयाची फुले : धोतरा , आंब्याचा मोहोर , पांढरी फुले , निळे कमळ .
वस्त्र : पांढरे , नैवेद्य : दही – भात .

३) श्री गणेश

प्रिय फुले : तांबडी फुले , मंदार पुष्पे , जास्वंदीची फुले , शमी , दुर्वा , तांबडी कमळे , शेदूर व रक्तचंदन.
नैवेद्य : मोदक . वस्त्र : तांबडे.

४) सूर्यनारायण

फुले : धोतरा , मंदार , तगर , तांबडी फुले , रक्तचंदन , दवणा .
वस्त्र : तांबडे , नैवेद्य : गूळ – भात .

५) देवी

फुले : बकुळ , जाई , केवडा , तगर , कुंद , मोगरा ,कण्हेर , कमळ , द्रोण पुष्प
वस्त्र : तांबडे , नैवेद्य : सांजा किंवा श्रीखंड .

तर आता आपल्याला समजलेच असेल की आपल्या देवतेला आपण कोणते पुष्प , वस्त्र व नैवेद्य अर्पण करायला हवा. आशा आहे आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल खाली दिलेल्या शेअर ऑप्शन वर क्लिक करून. धन्यवाद.

Share On:

Leave a Comment