समर्था तुझ्यावीण प्रार्थु कुणाला- श्री स्वामी समर्थअष्टक

‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ या वचनाप्रमाणे स्वामी आपल्या भक्तांच्या अशक्य कामना शक्य करतात, अर्थात पूर्ण करतात. आणि म्हणून सर्वाना स्वामी जवळचे वाटतात.

श्री स्वामी समर्थ अष्टक

प्रपंची असे पातकी दीन मी स्वामीराया ।
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ।।
नसे अन्य त्राता जगी या दीनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थ कुणाला ? ॥१ ॥

मला माय ना बाप ना आप्त बंधू ।
सखा सोयरा सर्व तू दीनबंधू ॥
तुझा मात्र आधार या लेकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थ कुणाला ? ।। २ ।।

नसे शास्त्र , विद्या कलादीक काही नसे ज्ञान ,
वैराग्य ते सर्वथाही ॥
तुझे लेकरू ही अहंता मनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थ कुणाला ? ।।३ ।।

पुरा बद्ध झालो दयाळा ।
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ।
क्षमेची असे याचना त्वत्पदाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थ कुणाला ? ॥४ ॥

मला काम क्रोधादिकी नागवीले ।
म्हणोनी समर्था तुला जागवीले ।।
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थ कुणाला ? ॥ ५ ॥

नको अंत पाहू त्वरे धाव घेई ।
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ।।
अनाथासि आधार तुझा दयाळा ।
समर्था तुझ्यावीण प्राथू कुणाला ? ।। ६ ।।

कधी गोड वाणी न येई मुखाला ।
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ॥
कधी मूर्ति तुझी न ये लोचनाला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्धू कुणाला ? ।।७

मला एवढी घाल भिक्षा समर्था ।
मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा ।।
घडो पादसेवा तुझी किंकराला ।
समर्था तुझ्यावीण प्रार्थ कुणाला ? ॥८ ॥
॥ श्री स्वामीसमर्थार्पणमस्तु ।।

श्री स्वामी समर्थ अष्टक

  • स्वामींचे हे अष्टक खूप प्रभावी आणि फलदाई आहे.
  • सर्व स्वामी भक्तांनी हे रोज एकदा नक्की पठन करावे.
  • कोणतीही ईच्छा पूर्ण करण्यासाठी व भयनाशासाठी हे खूप प्रभावी काम करते.
  • अक्कलकोट स्वामीच्या सर्व भक्तांनी दररोज आणि विशेषतः दर गुरुवारी याचे निश्चित पठन करावे.

Share On:

2 thoughts on “समर्था तुझ्यावीण प्रार्थु कुणाला- श्री स्वामी समर्थअष्टक”

Leave a Comment