श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन विशेष : संपूर्ण माहिती, कथा.

स्वामी समर्थ असे झाले प्रकट :

स्वामी समर्थ प्रकटदिन

नृसिंह सरस्वती कर्दळी वनात तपश्चर्या करत असताना अचानक फार मोठे वारूळ त्यांच्या भोवती निर्माण झाले . बराच काळ तपश्चर्या केल्याने हे वारूळ आले असावे . कर्दळी वनात एका भिल्लाने या वारुळावर कुऱ्हाड मारली आणि भळाभळा रक्त वाहून त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकटले . स्वामी समर्थ ( अक्कलकोट स्वामी ) हे दत्तात्रेयांचे अवतार आहेत . कर्दळीवनात वारुळातून प्रकटल्यावर ते कर्दळीवनातून निघाले आणि त्यानंतर अनेक देश / तीर्थ फिरले . विविध चमत्कार करून भक्तसमूह जमवणे हा त्यांचा स्थायिभाव होता .

चमत्कारिक वर्तन :

अक्कलकोट स्वामी समर्थांचे वर्तन हे अतिशय चमत्कारिक असे होते . जे सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे होते . त्यांचा आचार व वर्तन हे मात्र एखाद्या अवधूतासारखेच होते . ते पिशाच्चासारखे वावरत असत . रागीट स्वभावाचे आणि उर्मट , उन्मत्त वृत्तीचे स्वामी समर्थ होते . लोक त्यांना खूप घाबरत असत . स्वामी दिसायला मात्र अतिशय रेखीव होते . भव्य कपाळ , सरळ नाक , रुंद चेहरा , भस्मलेपन खूप करायचे . दिवसातून दोनदा आंघोळ करायचे . त्यांना गाय व कुत्रा फार आवडे .

स्वामी समर्थांनी दत्तोपासना वाढवली:

श्री स्वामी समर्थांनी दत्तउपासनेचा प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्याचे महान कार्य केले . स्वामींमुळे महाराष्ट्रात दत्त उपासना खूप वेगाने पसरली .त्यांना भेटण्यास त्यांच्या दर्शनास रोज १५०० लोक रोज येत असत . त्यांना ते उपदेश करत असत . त्यांच्यायोगे दत्तभक्तांमध्ये बरीच वाढ झाली . ते जवळपास संपूर्ण आयुष्य अक्कलकोट येथे राहिल्याने त्यांना अक्कलकोट स्वामी असे नाव रुढ झाले .

ही ही वाचा :समर्था तुझ्यावीण प्रार्थु कुणाला- श्री स्वामी समर्थअष्टक – JK Bhakti

दिगंबर बुवा :

अक्कलकोट स्वामींना ‘ दिगंबर बुवा ‘ असे म्हणत असत . ते अनेक चमत्कार करत असत . उदा . जगन्नाथपुरीत जन्मांध ब्राह्मणाला त्यांनी दृष्टिदान दिले . शूद्रास पुत्रप्राप्ती करून दिली , यवनास आत्मज्ञान दिले . बाबाजी ब्राह्मणाच्या कोरड्या विहिरीस पाणी आणले ; रामदास स्वामी बुवांचे गर्वहरण केले असे अनेक चमत्कार करत त्यांनी लोकांचे प्रबोधन केले . मंगळवेढ्याजवळच्या अरण्यात ते संचार करीत . त्यामुळे त्यांना ‘ दिगंबर बुवा ‘ म्हणत .

पादुका स्थापना , मठ उभारणी :

स्वामी समर्थांचे भक्तगण वाढत होते . त्यांच्या भक्तांपैकी बाळप्पा आणि चोळप्पा हे अतिशय लाडके भक्त होते . स्वामींच्या भक्तांनी त्यांच्या पादुकांची ठिकठिकाणी स्थापना केली आणि स्वामींचे मठही बऱ्याच ठिकाणी उभारले गेले . चोळप्पा भक्तावर समर्थांचे खूप प्रेम होते . त्या भक्तांकडेच स्वामी राहत . राजुर गावीही त्यांच्या पादुका स्थापन झाल्या .

श्रीक्षेत्र अक्कलकोट :

“ श्री दत्त अवतारांपैकी स्वामी समर्थांचा अवतार महत्त्वाचा अवतार आहे . श्री दत्तक्षेत्रांपैकी महत्त्वाचे दत्तक्षेत्र अक्कलकोट येथे समर्थांची समाधी आणि पादुका आहेत . लाखो भक्त येथे दर्शन घेऊन दुःख व संकटमुक्त होतात . ” श्रीक्षेत्र अक्कलकोटला भक्तमंडळींची अहोरात्र गर्दी असते . स्वामींच्या पादुका आणि समाधीकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी येथे रीघ असते . येथे दर्शन घेतल्यावर संकटमुक्ती होते असा अनेक स्वामी भक्तांचा रोकडा अनुभव आहे .

स्वामींचा अलोट भक्तपरिवार :

दत्त संप्रदायात सर्वात अधिक स्वामी समर्थांचा मोठा भक्तपरिवार आहे . स्वामींचे अवतार कार्य पुढे नेण्याचे कार्य त्यांचे शिष्य पुण्याचे बिडकर महाराज , आळंदीचे नृसिंह सरस्वती , मंगळवेढ्याचे सीताराम महाराज आदी भक्तगणांनी प्रामाणिकपणे केले होते . नगर , पुणे , ठाणे , रत्नागिरी , मुंबई आदी विविध जिल्हा , तालुके , मोठी शहर येथे समर्थांच्या भक्तांनी नित्यसेवेसाठी स्वामींची मठ उभारणी केली . ठिकठिकाणच्या या मठात नित्य दत्त व समर्थ नामस्मरण सुरू झाले . स्वामी समर्थांची भक्त संप्रदाय मंडळेही सुरू झाली .

ही ही वाचा :औदुंबर पूजन : परम फलदाई व दत्तप्रिय औदुंबराची संतती सुखासाठी अशी करा सेवा. (jkbhakti.com)

गुरुलीलामृत ग्रंथ :

” गुरुलीलामृत हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी भक्तांसाठी उपासनेची एक पर्वणीच आहे . एका स्वामी भक्ताने रचलेला हा ग्रंथ त्यांच्या अनुयायांनी अक्षरशः डोक्यावर घेतला .अहमदनगर येथील वांभोटी या गावात रहाणारे वामनबुवा ब्रह्मचारी हे अहमदनगरमध्ये राहून नित्य स्वामी सेवा करत . ते समर्थांचे परमभक्त होते . समर्थांच्या दर्शनास ते नेहमी जात . त्यांच्यावर स्वामी समर्थांची विशेष कृपा होती . समर्थांचे चरित्र , कार्य व उपदेशाचा प्रसार करण्यासाठी वामनबुवांनी ‘ गुरुलीलामृत ‘ हा महान ग्रंथ रचला आणि स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला .

Share On:

Leave a Comment