औदुंबर पूजन : परम फलदाई व दत्तप्रिय औदुंबराची संतती सुखासाठी अशी करा सेवा.

औदुंबर हा परम फलदाई आणि दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे. नृसिंह अवतारात हिरण्याकशपूच्या वधानंतर भगवान विष्णूच्या नखात दाह निर्माण झाला तेंव्हा त्यांनी आपली नखे औदुंबरात खुपसली आणि त्यांचा दाह कमी झाला, यावेळी त्यांनी त्यास आशीर्वाद व वर दिला, आणि या वरस्वरूप औदुंबराचे पूजन करणाऱ्या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.

हे ही पहा : मुलं सतत आजारी पडतात व चिडचिड करतात- हे स्तोत्र पठन करा (pdf)- JK Bhakti

औदुंबराचे खालीलप्रमाणे पूजन करून आपल्या ईच्छा पूर्ण करू शकता.

  • औदुंबर हा संततीदायक आणि संततीचे दीर्घायुष्य रक्षण करणारा असा वृक्ष आहे .
  • ज्यांचे विशाखा नक्षत्र असून ज्यांना संतती चिंता आहे अशा व्यक्तींनी दत्तप्रिय वृक्ष औदुंबराची नित्य सेवा करून त्यायोगे दत्तगुरुंची कृपा संपादन करावी .
  • दर गुरुवारी आणि विशाखा नक्षत्र आकाशात उदीत असताना दत्तदर्शन घेऊन , उंबर वृक्षास ( ११ , २१ , ३१ , १०८ ) प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करावा . आपली जी संतती समस्या असेल उदा . संतती न होणे , संतती न जगणे , गर्भपात , संतती होऊन जाणे इ . औदुंबरास सांगणे आणि ती समस्या सोडविण्यास गाऱ्हाणे घालणे .
  • औदुंबराचे हळद – कुंकू , पिवळे फूल , दीप , धूप – अगरबत्ती आणि खडीसाखर ठेवून पूजन करावे आणि संतती सौख्याची प्रार्थना करावी . आणि मनोभावे नमस्कार करावा . ( गुरुवार / नक्षत्र असताना )
  • औदुंबरास विशाखा नक्षत्र असता ३ लोटे जल देऊन श्री दत्तगुरुंचे स्मरण करून नमस्कार करावा .
  • विशाखा नक्षत्र असता दर महिन्यातून एकदा असताना वर्षभर औदुंबर वृक्षाजवळ तुपाची पणती संध्याकाळी नेऊन ठेवावी .
  • विशाखा नक्षत्र असता गुरुचरित्राचा औदुंबराजवळ बसून मनोभावे वाचावा आणि श्री दत्तांना मनोभावे नमस्कार करावा . ( हा अध्याय संतती प्राप्तीसाठी वाचतात . )

हे ही पहा : प्रभावी श्री दत्तकवच- ग्रहपीडा व बाधा निवारक. (ग्रहपीडा निवारक) JK Bhakti

तर आपण हे उपाय नक्की कराल आणि दत्ताकृपेने आपल्या मनोकामना पूर्ण होवोत हीच अपेक्षा.
{ साभार, प्रिया मालवणकर (ज्योतिषशास्त्री, वास्तुतज्ञ ) }

Share On:

3 thoughts on “औदुंबर पूजन : परम फलदाई व दत्तप्रिय औदुंबराची संतती सुखासाठी अशी करा सेवा.”

Leave a Comment