स्मृतिभ्रंश , विस्मरण या त्रासापासून वाचा या मराठी ‘Tongue Twister’ ने

‘Tongue Twister’ आज आपण अनेक पाहतो, अनेक चित्रपटात ते उच्चारले जातात, जस की, ” खडकसिंग के खडकनेसे खनकती हें खिडकिया “ किंवा ” चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदी के चमचे से चटणी चटाई “ हे तर अगदी अलीकडील आहेत पण खुद्द समर्थ रामदासांनी सुद्धा त्यांच्या काळात काही असेच ‘Tongue Twister’ लिहून ठेवलेले आहेत, चला तर बघूयात समर्थ रामदास स्वामिंनी रचलेले मराठी ‘Tongue Twister’ .

समर्थांचे हे नृसिंह पंचक न अडखळता जोरात म्हणण्याचा प्रयत्न करा जीभेसाठी व्यायाम आणि वाढत्या वयानुसार स्मृतीभंश, विस्मरण यांसारख्या मेंदूच्या त्रापासून स्वत:चा बचाव करा चला तर पाहूया हे समर्थधन.

* लाटानुप्रास *

ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे त्यांच्या साठी हा भाषालंकार अनुप्रास समुद्राच्या लाटांप्रमाणे येतो .

श्रीसमर्थरामदास कृत नृसिंहपंचक

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें
खवळत रिपुकाळे काळकाळें कळाळें
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हीजाळें ।।

झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी
लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी ।
हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी
कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं ।।

कडकडित कडाडी कडकडाटें कडाडीं
घडघडित घडाडी घडघडाटें घडाडीं
तडतडित तडाडी तडतडाटें तडाडी
धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं ।

भरभरित भरारी भर्भराटे भरारी
थरथरित थरारी थर्रथराटे थरारी
तरतरित तरारी तर्तराटे तरारी
चर्चरित चरारी चर्चराटे चरारी ।।

रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी ।
गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी ।
न धरित जन मानें लोक गेलें निदानें ।
हरिजन भजनानें शांत केलें दयेनें ।।

आशा आहे समर्थांचे हे tongue twister आपण मनापासून स्वीकाराल ही माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. खालील बटणवरून शेअर करा.

Share On:

Leave a Comment