दारिद्र्य नाशक श्री महालक्ष्मी अष्टक

मनुष्य जीवनात सर्वात मोठी समस्या निर्धनता , धनाच्या अभावा मुळे मनुष्य मान – सम्मान , प्रतिष्ठा सर्वा पासुन वंचित राहतो , शास्त्रामध्ये वर्णन आहे की दारिद्रनाश करण्यासाठी सदैव महालक्ष्मीची उपासना करावी .

हे ही पहा – कोणत्याही संकट नाशासाठी दत्त स्तोत्र

पौराणिक कथेनुसार देवराज इंद्र रुष्ट होऊन , देवगुरु बृहस्पती सह स्वर्गलोक त्याग करून गेले असता , दानवांनी ह्या संधीचा फायदा घेत स्वर्गलोकावर आक्रमण केले . देव – दानव यांच्यात युद्धं झाले त्यात देव पराजित झाले , दानवांनी स्वर्गावर कब्जा केला . देवराज इंद्र रुष्ट होऊन एका सरोवरात कमळाच्या कळीत लपून राहिले . आणि तेथूनच देवी लक्ष्मी ची स्तुति करू लागले , आणि हीच स्तुती ” महालक्ष्मी अष्टक स्तोत्र ” म्हणून प्रसिद्ध झाली . ” ही वास्तव मध्ये आठ श्लोकांची एक स्तुति आहे , आठ श्लोकांनी युक्त असल्याने यास ” महालक्ष्मी अष्टक स्तोत्र ” म्हटले आहे . ह्या महा लक्ष्मी अष्टक स्तोत्र स्तुतिमुळे , इंद्रदेवांनी आपले गमावलेले ऐश्वर्य पुन्हा प्राप्त केले .

श्री महालक्ष्मी अष्टक

श्री गणेशाय नमः , इंद्र उवाच —

” नमस्तेस्तु महामाये श्री पीठे सुरपूजिते !
शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते !! 1 !!

नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरि !
सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमो ~ स्तुते !! 2 !!

सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरि ! •
सर्व दु : ख हरे देवि महालक्ष्मी नमोस्तुते !! 3 !!

सिद्धि बुद्धि प्रदे देवि भुक्ति मुक्ति दायिनी !
मंत्र मूर्ति सदा देवि महालक्ष्मी नमोस्तुते !! 4 !!

आद्यंतर्हिते देवि आद्यशक्ति महेश्वरी !
योगजे योग सम्भूते महालक्ष्मी नमोस्तुते !! 5 !!

स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे !
महापाप हरे देवि महालक्ष्मी नमोस्तुते !! 6 !!

पद्मासनस्थिते देवि परब्रह्म स्वरूपिणी !
परमेशि जगन्नमातर्महालक्ष्मी नमोस्तुते !! 7 !!

श्वेतांबर धरे देवि नानालंकारभूषिते ! जगत्स्थिते जगन्नमातर्महालक्ष्मी नमोस्तुते !! 8 !!

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेन्नभक्ति मान्नरः !
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा !!

एककाले पठेन्नित्यं महापातक नाशनम् !

द्विकालं य : पठेन्नित्यं धनधान्यसमन्वित : !!

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रु विनाशनं !
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्नावरदा शुभा !!

" इतींद्रकृत महालक्ष्मी अष्टकम संपूर्ण ,


पठन कसे करावे ?

  • हे अष्टक सर्वप्रकारचे दारिद्र नाश करणारे आहे.
  • देवी महालक्ष्मी समोर तुपाचा दिवा लाऊन हे स्तोत्र कमीत – कमी दर दिवशी 3 वेळा पाठ करावे .
  • शुक्रवारी 108 वेळा पठन केले असता शिग्रगतीने ह्याची फलप्राप्ती होते .
  • रोज पाठ केल्याने दारिद्रता नष्ट होऊन , एश्वर्य प्राप्त होते .

Share On:

1 thought on “दारिद्र्य नाशक श्री महालक्ष्मी अष्टक”

Leave a Comment