जपमाळ माहिती : जप कोणत्या बोटाने करावा,कधी व कश्याप्रकारे करावा. संपूर्ण माहिती

मंत्र जप कसा करावा ?

देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
|| बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम् |असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत् ||
याचा अर्थ :देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो.

हे ही पहा : घोरकष्टोद्धरण स्तोत्र (पठण कसे करावे) – JK Bhakti

माळेमध्ये फक्त १०८ मणी का असतात ? ह्याची वेगवेगळी कारणे…

शास्त्रामध्ये सांगितले आहे की :

|| षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति |एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा ||

या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या १०८ चा संबंध आहे.सामान्यतः २४ तासांमध्ये व्यक्ती २१६०० वेळेस श्वास घेतो. दिवसातील २४ तासांमधील १२ तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक १२ तासांमध्ये व्यक्त १०८०० वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या १२ तासांमध्ये १०८०० वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी १०८०० वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी १०८ संख्या ठरवलेली आहे. या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये १०८ मणी असतात.

जप करण्याची योग्य पद्धत :-

 • शास्त्रानिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा.
 • उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते.
 • अंगठयाच्या सहाय्याने जप : मोक्ष प्राप्ती होते.
 • तर्जनीने जप : शत्रुनाश होतो.
 • मध्यमेने जप : धनप्राप्ती होते.
 • अनामिकेने जप : शांतीप्राप्त होते.
 • करांगुलीने जप : सुंदरताप्राप्ती होते.
 • जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी.
 • मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.

अतिशय प्रभावी :श्री दत्तस्तोत्रम (मन:शांती व संकटनाशक ) – JK Bhakti

जपाची शास्त्रीय पद्धत :

 मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे , या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठमध्यमायोगात्सर्व सिद्धी प्रदासने। (मंत्रमहार्णव) अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्वसिद्धी प्राप्त होतात.जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी

जपासंबंधी दिलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेन्ट करून नक्की सांगा .

Share On:

4 thoughts on “जपमाळ माहिती : जप कोणत्या बोटाने करावा,कधी व कश्याप्रकारे करावा. संपूर्ण माहिती”

 1. नमस्कार,खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  Reply

Leave a Comment