इंदुकोटी स्तोत्र

घरातील कलह,व सर्व बाधनाशक स्तोत्र

इंदुकोटी

दत्तभक्तहो नमस्कार,
आपले घर हे सदैव शांत, सुखदाई व बाधामुक्त असाव अस प्रत्येक व्यक्तीला वाटत असते, पण आपल्या या सुखात अनेक वेळ विविध अडथळे येत असतात. आपल्या या सुखी वास्तूला ग्रहण लागते, काही लोक न इर्षेने अनेक कपटी प्रयोग आपल्या घरावर करतात परिणामी घरात कलह निर्माण होतात, घरात भांडणे होतात, एकूण घर अशांत होत व त्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबातील सर्वांवरच होतो. मग अश्या या परिस्थित आपल्याला गरज असते ती दिव्य उपायांची तर आज आपण पाहणार आहोत एक असाच उपाय श्री वासुदेवानंद सरस्वती आपले सर्वांचे पूजनीय टेंबेस्वामी रचित श्री इंदुकोटी स्तोत्र. चला सुरुवात करुयात.

: इंदूकोटी स्तोत्र :

इंदुकोटितेजकीर्ण सिंधुभक्तवत्सलम् ।
नंदनात्रि सूनुदत्तमिंदिराक्षश्रीगुरुं ।
गंधमाल्यअक्षतादि वृंददेव वंदितं ।

वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥ १ ॥
मोहपाशअंधकार जातदूर भास्कर ।

आयताक्ष पाहि श्रीयवल्लभेशनायकम् ।।
सेव्यभक्तवृंदवरद भूयो भूयो नमाम्यहम् ।

वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् ॥२ ॥
चित्तजादिवर्गषट्कमत्त वारणाङकुशम् ।

तत्त्वसारशोभितात्मदत्त श्रीयावल्लभम् ।।
उत्तमावतार भूतकर्तृभक्तवत्सलम् ।

वंदयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् || ३ ||
• टेंबेस्वामींनी रचलेले प्रभावी स्तोत्र . •

स्तोत्र पठन कसे करावे

  • रोज स्तोत्र म्हणत संपूर्ण घरात पाणी शिंपडावे.
  • रोज शक्य नसल्यास दर गुरुवारी हा उपाय नक्की करावा.
  • हेही जर शक्य नसेल तर किमान पौर्णिमेला तरी हे करावे.
  • स्तोत्र पठन करताना सूचिर्भूत असणे गरजेचे आहे.
  • हे स्तोत्र पठन केल्याने बाहेरील बाधा दूर होईल.
  • सर्व त्रासाचे शमन होईल .

Share On:

5 thoughts on “इंदुकोटी स्तोत्र”

Leave a Comment