HOLI 2022 : होळी पेटवताना म्हणा हा मंत्र, सर्व पीडा दूर होतील,घरातील कीटक करा असे दूर, होळीचे वैज्ञानिक महत्व.

वैज्ञानिकदृष्टया महत्व: या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मध्ये शेणाच्या गोवऱ्या , त्यात एरंडाची फांदी ठेवतात . एरंडाचा एक दांडा उभा करतात . त्याच्याभोवती लाकडे गोवऱ्या रचतात . त्याची पूजा करावी . पुरण पोळीचा नैवेद्य दाखवावा . खेडेगावात सगळे गाव मिळून गोवऱ्या लाकडे गोळा करून सावर्जनिक ठिकाणी होळी करतात . तिची पूजा करतात , नंतर त्यात नारळ अर्पण करतात . खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात .

प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी . नंतर हातात पाणी घेऊन ” मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करतो ” असा संकल्प करावा . त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी . त्याची पंचोपचार पूजा करावी व नैवेद्य द्यावा .

होळीला प्रदक्षिणा करताना म्हणावयाचा मंत्र :

असृक्पाभयमंत्रस्तैः कृत्वा त्वं होलि बाहलशैः ।
अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव ॥

असा मंत्र म्हणून तीन प्रदक्षिणा घालाव्यात . खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा .

घरात त्रास देणारे जीव, किटक असे नष्ट करा : आपल्या घरात त्रास देणारे जीव किंवा कीटक जसे की ( झुरळे , डास , ढेकूण वगैरे ) कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात . म्हणजे ते जीवाणू नष्ट होतात . होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य , दोष , प्रवृत्ती यांची होळी करावी . संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात . हाच या सणाचा संदेश .

‘ जुने जाऊ द्या मरणा लागुनी । जाळुनी किंवा पुरून टाका ।। “

Share On:

Leave a Comment