Ganesh Chaturthi 2022: अशी करा घरच्या घरीच गणेशाची शास्त्रशुद्ध प्राणप्रतिष्ठा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा॥

भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकजण मोठ्या श्रद्धेने श्रीगणेशाची पार्थिव मूर्ती (मृत्तिकेची ) घरात आणतो. तिची स्थापना व पूजा यथासांग व्हावी अशी प्रत्येकाची उत्कट इच्छा असते. पण सध्या पूजा सांगणारा अधिकारी ब्राह्मण योग्य वेळी मिळणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन श्रीगणेशाची पूजा स्वत:ची स्वत:ला शक्यतो यथासांग करता यावी या दृष्टीने हा गणेशपूजेचा विधी दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला गणेशाची संपूर्ण पूजा व्यवस्थित केल्याचे समाधान मिळेल.
गणेशचतुर्थीची पूजा भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हसमयी गणपतिपूजा करावी. प्रात:काळी अंगाला तीळ लावून गरम पाण्याने स्नान करावे. बहुतेक वेळी गणपतीच्या पूजनाला तृतीयायुक्त चतुर्थी घ्यावी.


पूजेचे लागणारे साहित्य

हळदकुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दूर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने १५, गूळ, खोबरे, पंचामृत (दूध-दही-तूप-मध’साखर), शेंदूर, गंध, जानवे, कापूर, उदबत्ती, नारळ, खारीक, बदाम, फळे, दक्षिणा.
फुले पुढीलप्रमाणे- लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक, पुढीलप्रमाणे – पत्री २१ प्रकारची- १) मोगरी, २) माका, ३) बेलाचे पान, ४) पांढऱ्या दूर्वा, ५) बोरीचे पान, ६) धोत्र्याचे पान, ७) तुळस, ८) शमी, ९) आघाडा, १०) डोरली, ११) कण्हेर, १२) रुई, १३) अर्जुनसादडा, १४) विष्णुकांता, १५) डाळिंब, १६) देवदार, १७) पांढरा मरवा, १८) पिंपळ, १९) जाई, २०) केवडा, २१) अगस्तिपत्र.

एक महत्वाची सूचना

दिलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये आपल्याला संकल्प करावा लागतो ती माहिती दिलेली आहे, त्यामध्ये अमुक शब्दाच्या एवजी स्थापना करायच्या दिवशीची माहिती जसे की त्या दिवशीचा वार, नक्षत्र, मास, पक्ष, चंद्रस्थिती, सूर्यस्थिती यासारखी काही माहिती आपल्याला त्या दिवशीच्या पंचांगात पाहून उल्लेख करायचा आहे. ती आपण योग्य पद्धतीने भरावी.

श्री गणेश पूजा स्थापना पुस्तिका पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा.

Share On:

Leave a Comment