दीर्घायुषी होण्यासाठी धर्मशास्त्रातील हे नियम अवश्य पाळा

आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक कृतींसाठी काही ठरावीक नियम घालून दिलेले आहेत आणि जर आपण त्या नियमांप्रमाणे वर्तंन केले तर त्याचे विविध चांगले परिणाम आपल्याला अनुभवास येतात. त्यापैकीच एक आहे आपले धर्मशास्त्र यामध्ये आपले वर्तन कसे असावे याबाबत आपल्याला मार्गदर्शन केलेल आहे, आणि आज आपण पाहणार आहोत याच धर्मशास्त्रातील आपल्या निद्रेबाबतीत (झोपेसंबंधीत) असलेले काही नियम.

प्रस्तुत लेखात आपण यश कीर्ती मिळविण्यासाठी, दीर्घायुषी होण्यासाठी धर्मशास्त्रातील आणि विविध पुराणातील काही महत्वाचे नियम पाहणार आहोत, या नियमांनचे पालन केल्याने आपले यश व कीर्ती वाढते व दीर्घआयुष्य लाभते.


धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी नियम :-

१. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये.

२. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. (मनु:स्मृति)

३. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. (विष्णुस्मृति)

४. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. (चाणक्य नीती)

५. निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त (म्हणजे पहाटे ०३.४० ते ४.२८ च्या दरम्यान) उठले पाहिजे. (देवी भागवत).

६. पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये. (पद्मपुराण)

७. ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. (अत्रीस्मृती)

८. तुटलेल्या खाटेवर तसेच उष्टया तोंडाने झोपू नये. (महाभारत)

९. “नग्न” झोपू नये. (धर्मसूत्र)

१०. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते.

११. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात.

१२. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्यूभय असते.

१३. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते.

१४. दिवसा कधीही झोपू नका. पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास 48 मिनिटे झोपू शकता. (दिवसा झोपल्याने आजार उद्भभवतात व आयुष्य कमी होते.)

१५. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो. (ब्रह्मवैवर्त पुराण)

१६. सूर्यास्ताच्या तीन तासांनंतर झोपले पाहिजे.

१७. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

१८. यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते.

१९. हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये.

२०. पलंगावर बसून खाणे/पिणे हे अशुभ आहे.

२१. झोपताना वाचन करू नये, असे केल्याने नजरदोष निर्माण होतो.

२२. कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढावा.

या २२ नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते व निरोगी दीर्घायुष्य लाभते!

तर आशा आहे आपण या नियमांचे पालन करून आपले जीवन सुखी कराल आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारासोबत शेअर कराल, धन्यवाद.

Share On:

Leave a Comment