निराशा,संकट व बाधा नाशक दत्तस्तोत्र

पूज्य संत कावडीबाबचे चमत्कारीत श्री दत्तस्तोत्र

नमस्कार,
मानवी मन हे खूप शक्तिशाली आहे, कारण या मनाने एकदा ठरवले की ती गोष्ट ते सहज प्राप्त करू शकते, पण त्यासाठी मन खंबीर असणे खूप महत्वाचे असते, बऱ्याच वेळ मनावर कोणत्यातरी घटनेचा विपरीत परिणाम होतो , ते पूर्णपणे खचून जाते. कामात मन लागत नाही. मनात नेहमी नकोसे विचार येतात आणि मग सर्वकाही संपल्यासारखे वाटते, मग खऱ्या अर्थाने गरज असते ती मनाला धीर देणाऱ्या, खंबीर करणाऱ्या शक्तीची आणि याचसाठी संत कावडीबाबा यांनी रचना केली ती पुढील चमत्कारीत दत्तस्तोत्राची.
परम पूज्य कावडीबाबा हे परम दत्त भक्त होते. त्यांनी दत्त भक्तीचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. दत्त भक्तीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी बरेच दत्तसाहित्य निर्माण केले. त्यातील हे एक महत्वाचे मन खंबीर करणारे, निराशा दूर करणारे, संकटनाशक असे चमत्कारीत स्तोत्र आहे.


पूज्य संत कावडीबुवांचे चमत्कारित दत्तस्तोत्र

श्री गणेशाय नमः ।। जयजयाशी अविनाशा । निर्गुण परेशा । मायातीता तू सर्वेशा । अनंतवेषा नमो तुज ॥ १ ॥ जयजय निखिल ब्रह्म सनातना । सर्वात्मका सर्वभूषणा । षड्गुण ऐश्वर्य संपन्ना । दयाघना नमो तुज ।। २ ।। जय सर्वसाक्षी सर्वज्ञा । जयजयाजी गुणप्रज्ञा । सकळातीता सर्वसुज्ञा । भक्तवरदा नमो तुज || ३ || जय जय सगुणवेषा सुंदर । जय रजोगुणा सृष्टिविस्तारा । जय सृष्टिपालना सत्वधीरा । सृष्टिसंहारा तामसा नमो ॥४ ॥ जयजयाजी अत्रिनंदना । जय अनसूयात्मजा कुलभूषणा । त्रिगुणात्मक त्रितापहरणा । भवभंजना नमो तुज ॥ ५ ॥ जय जय सिंहाचल निवासिया । माया पुरवासी करुणालया । जय जय भक्तवत्सला दत्त सदया । प्रेमे तव पाया प्रणम्य ॥ ६ ॥ जय जय सिद्धा योगेश्वरा । पापमोचका कृपासागरा । जीवनपालका जगदुद्वारा । अचल अगोचरा नमो तुज ॥ ७ ॥ जय त्रिगुणात्मक त्रिवदना । जय षट्कमल राजीवनयना । जय शंकरमंडित भस्मविलेपना । भूषित भूषणा नमो तुज ॥ ८ ॥ जय शंखचक्र गदाधरा सर्वोत्तमा दुष्टसंहारा । अज्ञानछेदका दिगंबरा । अपरंपारा नमो तुज ॥९ ॥ जय त्रिशूल डमरू खड्ग धारणा अनन्यप्रिया भयवारणा । जय सकलनियांता कार्यकारणा । अगा सच्चिद्धना नमो तुज ।।१० ।। जय ब्रह्मचर्यव्रत संपादका । दण्डकमण्डलुकौपीन धारका । जय शार्दुलचर्मविराजका । सुख दायका नमो तुज ॥ ११ ॥ जय जय पावना परमानंदा । जय ब्रह्ममूर्ते आनंदकंदा । जय भेदातीता तू अभेदा । अद्वयबोधा नमो तुज ।।१२ ।। जय जगद्गुरू अविनाशा । निश्चळ निर्मळा बंद्य सुरेशा । अनंता अभंगा सकळाधीशा । परात्परपरेशा नमो तुज || १३ ।। अगा दीनोद्धारण दीन बंधु । तूं ध्यानी सुवृंदू । स्तुतिस्तवनाचा संवादू । सिद्धमुनिसाधू करिताती ।।१४ ।। तुज ध्याती सकल लोक । देव अमर ब्रह्मादिक । मूर्ति पाहोनि हरिहरात्मक । पूजिती आवश्यक ध्याति मुनि ।।१५ ।। श्यामसुंदर सुहास्य रूप देखोनी । अनन्ययोगे सर्व शरण । म्हणती दाता तू जगत्पावन । कृपादान दे आम्हा।।१६ ।। तू सदय आणि उदार । अनंत सिद्धीऋद्धीचे भाण्डार । द्वय कामधेनु निरंतर । सकळ सार तुजपाशी ।। १७ ।। तू भुक्तिमुक्तीचा दाता । तू सदयपणे जीव रक्षिता । तू चुकविशी सकळ आघाता । इच्छित पदार्थ देसी तू ।। १८ ।। तू सदा शांत सुप्रसन्न । अनन्य पाळिसी कृपे करून । आवडीचे भातुक देसी पूर्ण । भवबंधन तोडिसी ।।१९ ।। तू सकळ देवांचाही देव । तू सकळ सिद्ध योगियांचा राव । अनंत ब्रह्माण्डीची ठेव । तूंचि जीव जीवाचा ।।२० ।। तू आम्हां सकळांचा अधिपती । ज्ञेय ज्ञान ज्ञाता निश्चिती । तुझ्या कृपेवीण कैची गती । मूढमती जीव सर्व ।। २१ ।। तरि आतां होवोनि सुप्रसन्न । दत्ता दीजे स्तवनी मान । तुझे नाम पतितपावन । करी कल्याण सकळांचे || २२ ।। अमंगळ सकळ हरावें । सुमंगल दान वरदी द्यावे । अनन्याते तोषवावे । अंगीकारावें सकळही || २३ ।। यापरी ऋषी मुनि सुखर यक्षगण गंधर्व किन्नर । मानव आणि विद्याधर स्तवन अपार करिताती || २४ ।। मुख्य नारद भृगु विरचित । स्तवन करिती अत्यद्भुत । हे परिसोनी देवदत्त । कृपावंत अभय दे ।। २५ ।। तें अभय वरदवाणी । स्तोत्रीं स्थापिली मुनींनी । तेंचि या ग्रंथी विरचोनी । तुम्हां निरोपण निवेदितो ।।२६ ।। मुख्य येथे धरोनि प्रथम करावें अपूर्व । मानसपुजा विधि सर्व । सारोनि स्तव करावा ।। २७ ।। या स्तोत्राचे पठण । करावें वीस आवर्तन । एवं सहस्त्र संख्येचे आवर्तन पूर्ण । करितां प्रसन्न दत्त होय || २८ ।। भूत पिशाच्च समंध भय । जे नाना परीचे अपाय । ते निवटोनि करी उपाय । रक्षी काया सकृपें ।।२९ ।। यशदायक कीर्तिवर्धक । पुत्र – पौत्र दे धनधान्य । क्षेम आयुरारोग्य कल्याण । जयश्री पूर्ण प्राप्त होय ।।३० ।। राजा प्रजादि सकळिक । वश्य होती आवश्यक । श्रेष्ठपाणी सकळ लोक । वंदिती अनेक सेविती || ३१ ।। क्षय अपस्मारादि रोग जाती । कूष्माण्ड डांकिणी यक्ष पळती । यंत्र मंत्र तंत्र न बाधती । संरक्षत अवधूत ।।३२ ।। ग्रहपीडा नाना उपाधी । तुटती अवघ्या आधिव्याधी । वन जळ अग्निसंधीं । कृपानिधी तारील || ३३ ।। वितळोनि जाय अज्ञान । प्राप्त होय इच्छित ज्ञान । विद्या होय आयुष्यवर्धन । भुक्ति मुक्ति पूर्ण लाभवी ॥ ३४ ॥ प्रतिकार्या नेमिल्या नेमा । आचरण कीजे सोसोनि श्रमा । फळ पावे पूर्ण कामा । तया उत्तमा दया उपजे ।।३५ ।। मनीं नाणावे विपरीत । अनुष्ठानी बैसावे निवांत । परान्न प्रतिग्रह शय्यारत । विवर्जित असावे || ३६ ।। एवं साधितां निश्चियेंसी । त्वरित पावें अविनाशी । नाचरतां जो यातें दूषीं । तो रौरवासी पावेल ।।३७ ।। जो व्रतस्थ करील पठण । तया शत्रु होतील शरण | इच्छित कामना होतील पूर्ण | दत्तदर्शन लाभेल || ३८ || हें मुनीचें भाष्यार्थी । वरप्रदानें दिधली असती । तेचि निवेदिले प्राकृती । मिळवोनि संमति श्रोतिया ॥३ ९ ॥ इति श्रीअनंतसुत कावडीबोवा विरचित चमत्कारी दत्तस्तोत्रः संपूर्णः ।

स्तोत्र पठन कसे करावे

 • प. पू. कावडीबुवा हे परम दत्त भक्त होते,त्यांनी बरेच दत्त साहित्य निर्माण केले त्यापैकी हे एक महत्वाचे दत्त स्तोत्र आहे.
 • संकट,निराशा आणि विविध प्रकारच्या बाधा नष्ट करून मन खंबीर करणारे हे दिव्य स्तोत्र आहे.
 • सर्व दत्त भक्तांनी हे स्तोत्र नित्य पठन करावे.
 • हे स्तोत्र रोज एकदा पठन करावे.
 • रोज शक्य नसेल तर किमान दर गुरुवारी 1 ते 11 वेळ किंवा 21, 108 वेळ आपण म्हणू शकता.
 • कोणतेही आकस्मिक संकट आले तर गुरुवारी सूर्योदयापूर्वी संकल्प करावा व संकट निवारण होईपर्यंत 11/21/108 वेळ हे स्तोत्र रोज म्हणावे।
 • या स्तोत्राने मन प्रसन्न होते व निराशा दूर होते.

तर असे हे दिव्य स्तोत्र आपण नक्की पठन करावे व आपल्या समस्यापासून मुक्त व्हावे. दत्त कृपेने आपले कष्ट दूर व्हावे हीच आशा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

हे ही पहा-

 • घोरकष्टोउद्धरण स्तोत्र (सर्व कष्ट व संकटनाशासाठी )

 • Share On:

  7 thoughts on “निराशा,संकट व बाधा नाशक दत्तस्तोत्र”

  1. 🙏🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 🙏

   Reply
  2. माऊली स्तोत्र खूपच छान आहे मीही दत्त माऊलींची सेवा रोज करतो हे स्तोत्र आम्हाला व्हॉटसअप वर मिळाले तर खुप आनंद होईल

   Reply
  3. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

   Reply

  Leave a Comment