दत्तभक्तहो नमस्कार,
आपल्या सर्वांचे आराध्य व दत्त संप्रदयाचे प्रथम पुरुष/प्रथम अवतार भगवान दत्तात्रेय यांचा भुलोकी अवतार झाला तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या वर्षी १८ डिसेंबर 2021 रोजी येत आहे. हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण, या दिवशी दत्ततत्व खूप कार्यरत असते. या दिवशी दत्त गुरुची सेवा मनोभावे केल्यास विशेष लाभ होतो. महणून आपल्या हातूनही त्या योग्य सेवा घडाव्यात याचसाठी आज या पोस्ट द्वारे आपणास सविस्तर माहिती देत आहोत. चला तर मग सुरुवात करुयात. datta jayanti 2021.

दत्त जन्माची पूर्वकथा

महाऋषी अत्री हे एकदा स्नानसंध्या करण्यासाठी नदीवर गेले होते. त्यावेळी त्यांच्या आश्रमात 3 गोसावी आले आणि माई भिक्षा वाढा अशी आळवणी करू लागले . आपल्या आश्रमात अतिथि आले आहेत, हे बघून सती अनुसया आनंदित झाली. तिने त्या अतिथिंचे स्वागत केले, त्यांचे सुंदर आदरतिथ्य केले, त्यांना बसायला आसन दिले.
सती अनुसया त्या गोसाव्यांना भिक्षा वाढायला गेली असता ते गोसावी अनुसूयेला म्हणाले, ‘ माई तू आम्हाला निवस्त्र होऊन भिक्षा वाढलीस तरच आम्ही तिचा स्वीकार करू ‘ त्यांचे हे शब्द कानावर पडताच माता अनुसया अचंबित झाली. माता अनुसुयेचे तपसामर्थ्य आणि सत्व प्रचंड होते. ती समजून गेली की हे गोसावी दुसरे कोणी नसून माझे सत्व पाहण्यासाठी आलेले देवच आहेत. त्या साध्वीने आपल्या पतीचे स्मरण केले आणि कमंडलुतील जल त्या तिघांवर शिंपडले त्याबरोबर ते तिघे बालके झाली.
एवढ्यात ऋषी अत्री संध्या करून आश्रमात परतले. घडलेला सर्व प्रकार माता अनुसयेणे त्यांना सांगितला. अत्री ऋषिंणी हे ब्रम्हा ,विष्णु आणि महेश असल्याचे अनुसयेस सांगितले. देवांणीही त्यांना आशीर्वाद दिले व ब्रम्हा, विष्णु आणि महेशच्या अंशाने अनुक्रमे सोम(चंद्र), श्री दत्त व दुर्वास ऋषि जन्मास आले. श्री विष्णुच्या अंशाने तीन मुखे असलेले बालक आयोनीज जन्माला आले तेच हे त्रिगुण दत्त होय.

दत्त जयंती कशी साजरी करावी

श्री दत्त महाराज हेच आपल्या संप्रदयाचे मूळ आहेत महणून हा कार्यक्रम सामुदायिकपणे व खूप भक्तिभावाने करायचा असतो. श्री दत्त जयंती निमित्त सर्व दत्त भक्तांनी उपवास करायचा असतो व तो उपवास दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला सोडायचा असतो.

दत्तजयंती दिवशी खालीलप्रमाणे आराधना करावी

 • सकाळी लवकर उठावे व आपली नित्यकर्मे उरकावीत.
 • दत्तांच्या तसबीरीची हार, फुले वाहून पूजा करावी. (जाई,जुई,निशिगंध किंवा पिवळा चाफा वहावा)
 • ठीक 12:15 च्या नंतर श्री गुरुचरित्रातील 4 था अध्याय वाचायला सुरू करावा. (वाचन सावकाश करावे)
 • बरोबर 12:39 ला अध्याय वाचनातील “तीन बाळे झाली”.. या ओळीनंतर वाचन बंद करावे.
 • त्यावेळी सर्वानी ” अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ” असा जयजयकार करावा.
 • दत्त मूर्तीवर अथवा तसबीरीवर गुलाल व फुले उधळावीत.
 • त्यानंतर श्री दत्तांची आरती करावी. (दत्त आरती)
 • या दिवशी नैवेद्यात अन्नाचा नैवेद्य न करता फराळाचा उपवासाचा नैवेद्य करावा.
 • दुसऱ्या दिवशी श्री सत्यदत्त पूजा करून 6 अन्नाचे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा. (पूजा 10:30 पूर्वीच करावी)

तर आपणही या दिवशी दत्त जयंती साजरी करून संपूर्ण दिवस हा दत्त नामात व दत्तभक्तीत घालवावा. दत्त गुरूंचे काही शीघ्र फलदाई स्तोत्र पठन करावीत. त्यातील काही महत्वाची स्तोत्रे खाली दिलेली आहेत.

Share On:

8 thoughts on “दत्त जयंती कशी साजरी करावी | datta jayanti २०२१ in marathi”

 1. श्री गुरूदेव दत्त.
  दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

  Reply
 2. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त..!!!
  श्रीगुरुदत्तत्रेयायनमस्तू.!!!

  Reply
 3. मनी नाम तुझे मुखी नाम तुझे किती स्मरण गुरुदेवा सर्वसाधारण तुच दिसे जय जय गुरू देव दत्त 🙏🌻🌹🌺🌼🌻

  Reply
 4. मनी नाम तुझे मुखी नाम तुझे किती स्मरण करु गुरुदेवा सर्वस तुच दिसे जय जय गुरू देव दत्त 🙏🌻🌹🌺🌼🌻

  Reply

Leave a Comment